मुख्य सामग्रीवर वगळा

एका कार्यकर्त्याची डायरी...
====================

संपत आली 'पानं' आणि
आत्ता लक्षात आलं...
उगाच यांच्या नादी लागलो
खरंच चुकलं सालं ।।

वय होतं, जोश होता
सारं होतं रंगात
नेता येणार म्हटलं तरी
भूत यायचं अंगात
संदल काय, नाचणं काय
दमून जायची माती
नेत्यासोबत फोटो म्हणजे
छप्पन इंच छाती
पण फ्रेम तोडून आत कधी
जाता नाही आलं..
उगाच यांच्या नादी लागलो
खरंच चुकलो सालं ।।

मस्तीत नारे लावायचे
सॉलीड गुर्मीत बघायचं
एकाएका समोशावर
दिवस दिवस जगायचं
माय कुठं, बाप कुठं
फरक नव्हता पडत
घर काय, दार काय
सारं गेलं उडत
बायकोचंही रडणं कधी
ऐकता नाही आलं...
उगाच यांच्या नादी लागलो
खरंच चुकलं सालं।।

ज्यांना होती अक्कल त्यांनी
आधी चंदा केला
जय भवानी- जय भीम
म्हणत धंदा केला
हवा पाहून जे जे आपला
मांडत गेले तिव्हा
त्यांच्या ............खाली खुर्ची
त्यांना लाल दिवा
आपल्या पोराला साधं आईस्क्रीम
देता नाही आलं
उगाच यांच्या नादी लागलो
खरंच चुकलं सालं।।😔😭😢😒

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...