जोपर्यंत दगडाच्या देवाला देणगी दिली जाईल तोपर्यंत उपासमारीने मारणाऱ्या गरिबांची संख्या कमी होणार नाही. माणसाला माणसात देव दिसला तरच ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि आपण चांगली संस्कृती रुजवू शकू. आज एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे प्रचंड संपत्ती हि विसंगती दिसून येते. काही लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात तर काही लोक सात पिढ्या बसून खातील इतके कमावून बसलेले आहेत परंतु ते पोटभर खावू शकत नाहीत.