मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

VRS

स्वेच्छा निवृत्ति   ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जेव्हा प्रथमतः स्वेच्छा निवृत्ति घेण्याचा विचार मनात घोळू लागला, मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली आणि जो कोणी माझा विचार ऐकेल तो एकच प्रश्न विचारु लागला घरी बसून काय करणार ? साहजिकच मी यावर बरेच विचार मंथन केले त्यामधे मला असे  लक्षात आले कि जोवर पैसे मिळत आहेत तोपर्यंत कमवत राहावे अशी मानसिकता जवळ जवळ ९५% लोकांची आहे. बरेच लोक अगदी आजारी किंवा तब्येत खालावलेल्या स्थितीतहि नौकरी करत असतात. खरेच माणसाला जगण्यासाठी असा कितीसा पैसा लागतो? खरे पाहता सध्याची चौकोनी कुटुंबे महिन्याकाठी किराना, दूध, आणि इतर सर्व खर्च लक्षात घेता फ़ारतर २० हजार रुपयात आपले कुटुंब चालवतात. मग विनाकारण अति च्या मांगे लागून अवाढव्य खर्च वाढवून आपले स्वास्थ्य स्वताच्या  हाताने आणि हट्टाने बिघडवून घेतात.  राहण्यासाठी एक घर , आणि आपुलकी असलेले कुटुंबातील सदस्य ह्यावर न थांबत अंतर्गत सजावट, रंगकाम, गाडी अणि फार्म हाउस किंवा सेकंड होम वगैरे गोष्टी केवळ इतरांच्या तुलनेसाठी करत असतात. ह्या सर्व गोष्टींसाठी घरमालक पैसे कमावण्...