मुख्य सामग्रीवर वगळा

VRS


स्वेच्छा निवृत्ति 

३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जेव्हा प्रथमतः स्वेच्छा निवृत्ति घेण्याचा विचार मनात घोळू लागला, मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली आणि जो कोणी माझा विचार ऐकेल तो एकच प्रश्न विचारु लागला
घरी बसून काय करणार ?

साहजिकच मी यावर बरेच विचार मंथन केले त्यामधे मला असे  लक्षात आले कि जोवर पैसे मिळत आहेत तोपर्यंत कमवत राहावे अशी मानसिकता जवळ जवळ ९५% लोकांची आहे. बरेच लोक अगदी आजारी किंवा तब्येत खालावलेल्या स्थितीतहि नौकरी करत असतात. खरेच माणसाला जगण्यासाठी असा कितीसा पैसा लागतो?
खरे पाहता सध्याची चौकोनी कुटुंबे महिन्याकाठी किराना, दूध, आणि इतर सर्व खर्च लक्षात घेता फ़ारतर २० हजार रुपयात आपले कुटुंब चालवतात. मग विनाकारण अति च्या मांगे लागून अवाढव्य खर्च वाढवून आपले स्वास्थ्य स्वताच्या  हाताने आणि हट्टाने बिघडवून घेतात. 
राहण्यासाठी एक घर , आणि आपुलकी असलेले कुटुंबातील सदस्य ह्यावर न थांबत अंतर्गत सजावट, रंगकाम, गाडी अणि फार्म हाउस किंवा सेकंड होम वगैरे गोष्टी केवळ इतरांच्या तुलनेसाठी करत असतात. ह्या सर्व गोष्टींसाठी घरमालक पैसे कमावण्यासाठी घराबाहेरच असतो.  
मग अशा फार्म हाउस वर एखादी जोड़ी काम करण्यासाठी पैसे देऊन ठेवली जाते ज्यांना पगार देण्यासाठी यजमानाला अजुन काम करावे लागते अणि ही  जोड़ी आपल्या फार्म हाउस चा मनसोक्त उपभोग घेते,
शेवटी निवृत्त होताना अति शारीरिक कष्ट आणि मानसिक ताणतणाव यामुळे रक्तदाब, मधुमेह किवा तत्सम आजार सोबतीला असतात. मग कमावलेले पैसे दवाखान्यात घालावे लागतात. त्या पैशाचा उपभोग 
घेण्याआधी शरीर धोक्याची घंटा वाजवायला लागते आणि आपण कमावलेले सर्व इथेच ठेऊन जाताना अतिशय दुःख होते. 
सुखाने खाता येईल इतके कमवावे आणि जीवनाचा आनंद घेऊन आनंदाने निवृत्त व्हावे यासारखे आयुष्य नाही







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...