मुख्य सामग्रीवर वगळा

सकाळी आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा तिने मस्तपैकी भाजल्या.कामावरुन येवून, फ्रेश होवून टिव्ही समोर बसलो. बायको ने गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणुन ठेवली,कढईभोवती चौघेजण बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात केलेली.अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाना हातातुन खाली पडतो.आणी खालच्या टरफलांमध्ये गायब होतो. आपण मग तो बोटाने शोधायला सुरवात करतो.अगदीच अर्धा ते ऐक मिनीटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधतो.थोडेसे तरी वैतागतो. या नादात इतर सदस्य शेंगा जास्त संपवतात . . . आयुष्याचेदेखील असेच आहे का?पाटीभर आनंद शेजारी असुनही,आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो. पाटीकडे लवकर कधी लक्श जातच नाही.आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे निदर्शनास येते.
💐शुभ दिन 💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...