मुख्य सामग्रीवर वगळा

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀

सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला , 
" अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सौक्रेटिसने त्याला थांबवले . 
" कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो ."

" तीन गाळण्या ? काय , आहेत तरी काय त्या?"

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "

" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सौक्रेटिस म्हणाला . 
" आता दुसरे गाळणे . मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?"

" ओ ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .

" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सौक्रेटिसने विचारले . 
" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."

" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "

" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .

" हे पहा ," सौक्रेटिस म्हणाला , 
" जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही , 
माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही 
आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार ? 
म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "

.....आणि सौक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

* मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही . आयुष्य सुखी होईल !!!
     
👏👏👏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...