मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
आज  अनेक  बुवा बाबा आपली शिष्य मंडळी जमा करून  व्यवस्थित  पैसे कमावत  आहेत . त्यांच्या शिष्यागणात  हुशार लोक  आपली पोळी भाजून  घेतात. कोणी आपला व्यवसाय  वाढविण्यासाठी कोणत्या तरी मार्गात  जातो . तर कोणी आपल्याला मान  मिळावा म्हणून  ह्या मार्गात आलेले दिसतात. बाबा सुद्धा अशा खुश्कामास्कार्याना आपल्या जवळ  सांभाळताना दिसतात. हे खुश्कामास्कारे हेच त्या बाबाचे बलस्थान असते. हे लोक  गरीब  भोळ्या भक्तांना बाबाची महती सांगून  त्यांना त्या जाळ्यात  ओढतात  आणि बाबासोबत  आपला व्यवसाय  वृद्धिंगत  करतात. काही बाबा तर कर्मकांडाची शिदोरी घेऊनच  अवतार घेतात. आणि शुद्धीवर येवू पाहणाऱ्या समाजाला...
खूप  कमावून  ठेवेले तर पुढची पिढी आळशी निघते, आणि बापजाद्यांच्या कमाईवर ऐश  करते. लायक  मुलगा  वडिलांच्या कामायीमध्ये आपल्या कर्तुत्वाने आणखी वृद्धी करतो. तर नालायक  मुले वडिलांची कमाई केवळ खर्च  करतात.
प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय मीमांसा करून मगच ती गोष्ट करावी. सध्या मात्र सगळीकडे अंधानुकरण करण्याकडे माणसाचा कल आहे असे दिसून येते. यासंदर्भात एक गोष्ट आहे. एकदा एका आश्रमात एक महाराज होते. त्यांचे अनेक शिष्य तेथे विद्यार्जन करण्यासाठी तेथे राहत असत. महाराजांनि एक मांजर पाळलेली होती. ती मांजर आरती चालू असताना खूपच त्रास देत असे. म्हणून एकदा महाराजांनी एका शिष्याला आरतीच्या आधी ती मांजर बांधून ठेवायला सांगितली. महाराजांच्या आज्ञेवरून शिष्याने ती मांजर बांधून ठेवली आणि आरती झाल्यावर तिला सोडून दिले. झाले, तेंव्हापासून आरती करण्याआधी मांजर बांधायची प्रथा चालू झाली . कालांतराने महाराजांचे निधन झाले पण आरती पूर्वी...
नवीन व्याख्या - आपली गाडी थांबवून दुसर्याला पुढे जावू देणे याला म्हणतात संस्कृती . दुसर्यांबरोबर आपली गाडी पुढे नेणे म्हणजे प्रकृती. पण दुसर्याचा विचार न करता आपली गाडी पुढे नेणे म्हणजे विकृती.
जीवन जेव्हा हळू होते तेव्हा माणूस माणसाला ओळखत होता , परंतु आता जीवन खूपच व्यस्त झाले आहे, माणूस माणसाला ओळखत नाही, तो आता फक्त पैश्याला ओळखतो, आणि पैश्याच्या जोरावर माणसे विकत घेतो . परंतु तो हे विसरतो कि, पैसा हा कधीही तुमच्या कामाला येऊ शकत नाही, जितका माणूस कामाला येतो. आपला शब्द झेलणारे माणसे हि  पैश्याच्या जोरावर विकत घेतलेल्या गुंडा पुंडा पेक्षा केव्हाही जास्त मोलाची असतात.