मुख्य सामग्रीवर वगळा
प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय मीमांसा करून मगच ती गोष्ट करावी. सध्या मात्र सगळीकडे अंधानुकरण करण्याकडे माणसाचा कल आहे असे दिसून येते. यासंदर्भात एक गोष्ट आहे.
एकदा एका आश्रमात एक महाराज होते. त्यांचे अनेक शिष्य तेथे विद्यार्जन करण्यासाठी तेथे राहत असत. महाराजांनि एक मांजर पाळलेली होती. ती मांजर आरती चालू असताना खूपच त्रास देत असे. म्हणून एकदा महाराजांनी एका शिष्याला आरतीच्या आधी ती मांजर बांधून ठेवायला सांगितली. महाराजांच्या आज्ञेवरून शिष्याने ती मांजर बांधून ठेवली आणि आरती झाल्यावर तिला सोडून दिले. झाले, तेंव्हापासून आरती करण्याआधी मांजर बांधायची प्रथा चालू झाली . कालांतराने महाराजांचे निधन झाले पण आरती पूर्वी मांजर बांधायची प्रथा चालूच, कालांतराने त्या मांजराचे निधन झाले, आता मात्र प्रश्न पडला, कारण महाराजांनी सांगितले कि आरतीपूर्वी मांजर बांधा . म्हणून नवीन मांजर बाजारातून विकत आणण्यात आली आणि ती बांधून मग आरती करण्यात आली.
अशा तर्हेने आपण अनेक गोष्टी केवळ काहीही तर्क नसताना करत असतो मात्र शास्त्रीय विचार करण्याची आपली
 क्षमता आपण घालवून बसलो आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...