मुख्य सामग्रीवर वगळा

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता
विस्कटलेल्या नसतात,
अस्ताव्यस्त फेकलेले आता
कपडे कुठे नसतात.
TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही,
खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही

कारण-
आता मुलं  मोठी झाली आहेत 
आणि आम्ही एकटे झाले आहोत.

वर्तमानपत्रासाठी रोज सकाळीची मारामारी नसते,
घर मात्र खुप मोठे अन् नीटनेटके दिसते.
प्रत्येक खोली आता कशी अनोळखी वाटते.
रिकामी शांतता अन वेळ,
दोन्ही आता खायला उठतात,
लहानपणीच्या आठवणी फक्त
फोटोमध्ये दिसतात.
कारण-
मुलं मोठी झाली आहेत अन् आम्ही  एकटे झालो आहोत.

येऊन कोणी आता कधी गळ्यात नाही पडत,
नाही कोणी कश्यासाठी हट्ट आता करत.
घास भरवताना आता चिमणी नाही उडत,
घास भरविल्याचं सुद्धा, समाधान नाही मिळत.

रोजच्या चर्चा अन वादविवादाला,
मिळाला पूर्णविराम,
भांडण मिटविल्याचे देखील,
आता नाही समाधान.
येता जाता कोणी आता "पप्पी" घेत नाही.
पैशाची आता कधी, चणचण भासत नाही.

कारण-
मुलं मोठी झाली आहेत अन् आम्ही एकटे झालो आहोत.

आयुष्याचा सुवर्णकाळ संपला,
पापण्या लवता लवता,
सुंदरशी अनुभूती संपली,
कळता नकळता.
बोबड्या बोबड्या बोलामध्ये,
उत्साहाच उधाण होतं,
होतं क्षणात रडणं तर दुसऱ्या क्षणी हसणं होतं.
निष्पाप निरागस चेहऱ्यावर ओथंबुन प्रेम होतं.

आता नाही राहिलं ते, खांद्यावर घेऊन थोपटणं
आणि थोपटता थोपटता, मांडीवर निजवणं.
नाही आता बाळाचे ते
पांघरुण भिरकावणं दूर,,
दूर कुठे विरले आता,
अंगाईचे सूर.
बिछान्याचे रूप आता झालं आहे मोठं,
मुलाचं बालपण त्यात झालं आहे लुप्तं.
कोणी आता पायमोजे फेकत नाही इकडं तिकडं.
फ्रिजप्रमाणे घर देखील, असतं रिकामटेकडं

स्वयंपाकघर आहे उदास
अन बाथरुम असतं कोरडं.
दारावरची घंटी वाजताच,
उगाच होतं आशेचे जागणं
दार उघडताच कोणी गळ्यात पडून,
करेल काही मागणं.

पण-
सकाळ संध्याकाळ फोनवर होते,
चौकशी तब्येतीची,
सुचना असते त्यात
सक्त आराम करण्याची.

कधी काळी त्यांची भांडणं
आम्ही असू मिटवत
तेच आता आम्हाला
आहेत समजावून सांगत.
खरच जणु आम्ही आता लहान झालो आहोत.

मुलं झाली मोठी अन आम्ही एकटे झाले आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...