मुख्य सामग्रीवर वगळा

मातृभाषा

'स्वाती भागवत' ही जपानी भाषेची दुभाषी आहे.. देवेंद्र फडणविसांबरोबर दुभाषी म्हणून जपानला गेली होती.

तिथे एका जपानी शिक्षणतज्ञांशी चर्चा करण्याचा योग तिला आला. त्यातला एक संवाद असा जो तिने facebook wall वर पण टाकला आहे -

*जपानी गृहस्थ: भारतीय पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का  घालतात?*

*मी: आपली मुलं ग्लोबल व्हावीत असं पालकांना वाटतं.*

*जपानी गृहस्थ: ग्लोबल म्हणजे काय?*

*मी: Ready for the world!*

*जपानी गृहस्थ: Ready for US असं तर नाही म्हणायचं तुला?*

(मी विचारात असतानाच ते पुढे म्हणाले..)

*ग्लोबल म्हणजे नक्की काय? तुम्ही ग्लोबचा हिस्सा नाही का? भारताची लोकसंख्या बघता तुम्ही जगाचा मोठा भाग आहात.*

*मी: तुमची ग्लोबलची संकल्पना मला समजावून सांगा.*

*जपानी गृहस्थ: आपली संस्कृती, आपली भाषा, आपली मुळं नीट समजावून घेतल्यावर जगातील इतर संस्कृतींना सहिष्णु दृष्टीने समजून घेणे म्हणजे ग्लोबल. त्यासाठी संवादाची भाषा म्हणून इंग्रजीची गरज पडेलही. पण अनुकरणासाठी नाही तर समजून घेण्यासाठी. कुठलीही भाषा त्या त्या संस्कृतीचा आरसा असते. तुम्हाला जर स्वतःच्या भाषेतील साहित्य वाचता येत नसेल तर तुम्ही इतर संस्कृतींना कसे समजून घेणार? आणि खऱ्या अर्थानी ग्लोबल कसे होणार?*

(अंतर्मुख व्हा आणि बघा पटतंय का.......???👆🏻😇)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...