मुख्य सामग्रीवर वगळा

Appointment

*'महिन्यातून एकदा स्वतः ची अपाँईंटमेंट घ्या."*

आज प्रत्येकाचे जीवन व्यस्त झाले आहे.कामाच्या व संसाराच्या जबाबदारीने प्रत्येकाची दमणुक होतेेय,ताणतणावाच्या जीवनात हळूहळू माणुस मानसिक व शारीरिक दृष्ट्या कमजोर होत जातो, त्यामुळे नैराश्य,चिडचिडेपणा,असहाय्यता अशा अनेक प्रकारच्या बाबींनी तो ग्रस्त आहे.यातच सोशल मिडीयामुळे तो एकटा होत चाललाय.दिवसभर काम व उरलेल्या वेळात सोशल मीडिया यामुळे त्याला स्वतः कडे बघायला पण वेळ नाही.मार्केटिंग मधला व्यक्ती तर रोजरोजच्या अनेकजणांच्या अपाँईंटमेंट घेण्यामध्ये व्यस्त आहे.त्यासाठी करावी लागणारी धावपळ,त्रास हे सहन करण्याच्या पलिकडे आहे.तीथे त्याच्या संयमाची कसोटी लागते.विकएंडला कुठे जावे तर तिथेही गर्दी आणि ट्रँफीक जीव काढतयं.म्हणजे सुट्टी दिवशी सुद्धा ताण.

   यासाठी किमान महिन्यातून एकदा स्वतः चीच अपाँईंटमेंट घ्या.त्या दिवशी कुणालाच एंटरटेन करू नका. मोबाइल स्वीच आँफ म्हणजे स्वीच आँफ.काँलेज असताना जसा बसने प्रवास करायचा तसाच प्रवास करायचा,मस्तपैैकी एकादा मँटीनी सिनेमा नाहीतर नाटक बघायचे.काँलेजला असताना पैसे कमी असायचे म्हणून  जसा बाल्कनी ऐवजी स्टाँलमधून बसून सिनेमा बघायचो तसाच बघायचा.चालत फिरायचे,टपरीवर बसून चहा प्यायचा,कुठतरी भेळ खायची,रमतगमत घरी परतायचं,कोणतीच जबाबदारी नसताना जसं वागत होतो तसचं त्या दिवशी वागायचे.

त्यातून जुन्या दिवसातील हरवलेल्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील.सुखदुखाःच्या गोष्टी आठवत बसण्यापेक्षा किंवा कोणाला सांगत बसण्यापेक्षा अनुभवायचा प्रयत्न करायचा,कारण तुमच्या सुखदुखा:च्या गोष्टींमध्ये आता कुणाला फारसा इंटरेस्ट नसतो.मुलं सुद्धा तेच तेच ऐकून कंटाळली असतील.त्यांना बोअर करण्यापेक्षा बाहेर पडून एक दिवस मस्त आनंदात घालवून बघायला काय हरकत आहे.सोबत जुने मित्रमैत्रीणी असतील तर अजूनच मजा येईल.

😄👍�👍�👍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...