Social media आणि instant messaging app यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात वेगळेच स्थान प्राप्त केले आहे. माझ्या मागील लेखात मी याच्या वापराबद्दल भरपूर लिहिले होते परंतु आज या माध्यमांच्या वापरापेक्षा त्यावरील पोस्ट ची सत्यता आणि पोस्टवरील प्रतिक्रिया यावर लिहावे असे प्रकर्षाने जाणवले म्हणून हा लेखन प्रपंच. माकडाच्या हाती कोलीत अशी काहीशी या माध्यमांची अवस्था आहे, कोणीही उठावे काहीही लिहावे आणि कोणाच्याही नावावर खपवावे असे काहीतरी सतत चालू असते. कोणालाही आपणास आलेल्या पोस्ट ची सत्यता पडताळून पाहण्यात रस नसतो, मात्र आलेली पोस्ट तात्काळ पुढे पाठवण्यात धन्यता वाटते. आपल्या राष्ट्रगीताला जगात एक नंबर मिळाला, गोठवलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक फायदे या आणि अशा अनेक गोष्टी बिनदिक्कतपणे पुढे पाठवल्या जातात. बऱ्याच लोकांना यामुळे मानसिक त्रास पण होतो, अगदी पाठवणाऱ्याला, ज्यांना पाठवले जाते त्यांना आणि ज्यांच्या नावावर ती पोस्ट खपवली जाते त्यांनाही. मात्र अश्या प्रकारच्या पोस्ट पाठवणाऱ्या अतिहुशार समूहाला काय म्हणावे हेच समजत नाही. यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच आहे. ...
महाराष्ट्राची 'मधुशाला' एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करु द्या. मद्यपान ही माणसाची गरज नाही. अगदी सैबेरियातल्या उणे 30-40 अंशात जगणाऱ्या माणसाला व्होडका गरजेची नसते. तशी सहारा वाळवंट तुडवणाऱ्यालाही बियर उपयोगाची नसते. मद्य हे अन्न नाही. मद्यातून माणसाला कोणतंही (लौकिकार्थानं) जीवनसत्व, प्रथिनं, अन्नद्रव्यं मिळत नाहीत. मुळातच दारुत उंची वगैरे असा काहीच प्रकार असत नाही. "सिंगल माल्ट स्कॉच शिवाय कशालाही मी तोंड लावत नाही",अशी शेखी मिरवणारे उच्चभ्रू शहाणे आणि "पाच-पन्नास रुपयांची नारिंगी-मोसंबी ढोसणारे बिच्चारे," या दोन्हीतला गुणात्मक फरक शून्य. अल्कोहोल नावाचं रसायन हे निव्वळ अल्कोहोल असतं...मग ते पन्नास वर्षं जुनं असो की पन्नास दिवसांपुर्वी बाटलीत भरलेलं. 'ट्वेन्टी इयर ओल्ड', 'व्हिंटेज वाईन' यासारखी सगळी थेरं म्हणजे ग्राहकाला भुलवण्यात प्रचंड प्रभावी आणि यशस्वी ठरेलली विक्री तंत्रं आहेत. मी स्वतः नैमित्तीक मद्यपान करत असलो तरी मद्यपानाचं समर्थन अजिबात करत नाही. 'मद्यपान प्रतिष्ठेचं असतं', 'मद्यपान आणि उच्च अभिरुची यांचा संबंध आहे...