मुख्य सामग्रीवर वगळा
करोडो रुपये स्विस बँकेत जमा करणारे नेते जनतेवर अतिरिक्त tax लावताना लाजत का नाहीत? जनतेच्या tax  च्या रुपात जमा झालेल्या पैश्यावर गब्बर झालेल्या डोमकावाल्याना आपण परत परत निवडून देणार का?
जनतेचे भले करणारे आणि त्यांची सेवा करणारे नेते आता फक्त पुस्तकात पाहायचे का?
काहीही कर्तुत्व नसताना केवळ बापजाद्यांच्या पुण्याईवर नेते बनलेल्या बिनडोक आणि खाबू गिधाडांना आपण का मते देतो? झोपड पट्टी मध्ये पैसे वाटून कोणीही निवडून येतो, मात्र त्याने वाटलेले पैसे मात्र आपण कररूपाने सरकार जमा करतो, परंतु ते सर्व पुढील निवडणुकीसाठी स्विस बँकेत जमा होतात.
विचार करा, जर असेच चालू राहिले तर हे धनदांडगे सर्व सत्ता नी शासन आपल्या कब्जात घेऊन आपले जीवन जगणे मुश्कील करून टाकतील.
उठा , जागा , आणि बदल करा.
आपले मत केवळ लायक उमेदवारालाच द्या.
 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...