मुख्य सामग्रीवर वगळा

नाना  पाटेकर  यांच मनोगत
क्रुपया  वाचा आणि  जास्तीत जास्त  शेअर करा.

शिर्डी साईबाबा  : प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० कोटी + सोने ३२ कोटी, + गुंतवणूक ४२७ करोड 
-------------------------------------
सिद्धीविनायक, मुंबई
वार्षिक  उत्पन्न  - २०० कोटी, गुंतवणूक: १२५ कोटी.
-------------------------------------
लालबागचा राजा :
१८ कोटी कमाई फक्त  गणपतीच्या १० दिवसातली, गुंतवणूक काहीशे कोटी
------------------------------------
गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी/मजूर मी स्वतः पाहिलेत अन - त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने  5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.

फक्त 3 देवांची संपत्ती कित्येक  हजार कोटीच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार कोटी एकट्या कुंभमेळयाला ‘अलोकेट’ करणारे आमचेच सरकार एका बाजूला .
स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी -चोळी-पोशाख  करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी
--स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात?

मग ह्या गरिबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायकाला मी 'भिकारी' का म्हणू नये?

मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला -तो आहे असा Raw स्वरुपात तुमच्या समोर मांडला,
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारन्याने जर या सगळ्या मंदिराचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायची ठरवली तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकत आहे का?            

मुळात एवढा पैसा आला कोठून?
देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिराचे विश्वस्थानाननी  कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?
लोकांचाच पैसा ना हा? मग दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडला?
हि फक्त ३ देवांची नावे होती–
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेन?
अन छोटी-छोटी तर हजारो लाखो मंदिरे आहेत आपल्या देशात–राज्यात--- त्यांचे पैसे किती?

मुळात हा पैसा - म्हणजे नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
दोन मिनिट असं मानलं कि  भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे –गावातले सोडा नुसते मंदिराशेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!

माझ्या इथ ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला…
पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशाच्या खऱ्या-मालकांना - गरीब शेतकर्यांना १०० टक्के मिळवून देईल –हे मात्र नक्की…

नाना पाटेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...

एकटे

बिछान्या वरच्या चादरी आता विस्कटलेल्या नसतात, अस्ताव्यस्त फेकलेले आता कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही, खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आत...