मुख्य सामग्रीवर वगळा

संपता श्रावण मास तो,
मानोन जाणत्याचा उपदेश,
त्वरित सन्मानाने प्रवेश,
मद्यप्रांती करावा ||१||

मद्यपान हा शुभप्रसंग,
साजरा करावा होवोन गुंग,
मात्र अतिसेवनी अतिप्रसंग,
कदापीही करो नये ||२||

ते दिनी बाजारहाट करावा,
'देठ', कोंबडा, सरंगा आणावा,
छान मसाल्यात पकवावा,
पिण्यानंतर खावया ||३||

चणे, दाणे, चमचमीत खाणे,
त्यास 'चकणा' ऐसे बोलणे,
'चाखणे' हा खरा शब्द जाणणे,
म्हणोन तोच वापरावा ||४||

कोंबडीचे तुकडे बारके,
मसाल्यात तळोन सारखे,
पेयपानप्रसंगी खावे थोडके,
त्यास म्हणती 'आरंभक' ||५||

श्रेष्ठ प्रतीचे मद्य आणोन,
प्रमाणात चषकात ओतोन, 
पाणी, 'कर्बवायुजल' मिसळोन,
उचलोन म्हणावे "चांगभले" ||६||

मित्रांसह जमवावा 'पेयप्रसंग',
हास्यविनोदाचा उडवावा रंग,
मद्यापेक्षा तीच खरी झिंग,
हेच सत्य जाणावे ||७||

कवी रसिक कुलोत्पन्न,
त्याने रचिले हे उपदेशवचन,
असे जरी अल्पमति, अल्पज्ञान,
तरी भाव मात्र अनन्य ||८||
.......................................
•आरंभक=स्टार्टर,
• कर्बवायुजल=सोडा,
• चांगभले=चिअर्स
• पेयप्रसंग=पार्टी.🍺🍺🍺

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

💐💐 तीन गाळण्या 🍀🍀 सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला ,  " अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास म...
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
इस मैसेज को गौर से दो बार पढे ! जिस दिन हमारी मोत होती है, हमारा पैसा बैंक में ही रहा जाता है। * जब हम जिंदा होते हैं तो हमें लगता है कि हमारे पास खच॔ करने को पया॔प्त धन नहीं है। * जब ...