मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जोपर्यंत दगडाच्या देवाला देणगी दिली जाईल तोपर्यंत उपासमारीने मारणाऱ्या गरिबांची संख्या कमी होणार नाही. माणसाला माणसात देव दिसला तरच ह्या पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल आणि आपण चांगली संस्कृती रुजवू शकू. आज एकीकडे उपासमारी तर दुसरीकडे प्रचंड संपत्ती हि विसंगती दिसून येते. काही लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर काबाडकष्ट करावे लागतात तर काही लोक सात पिढ्या बसून खातील इतके कमावून बसलेले आहेत परंतु ते पोटभर खावू शकत नाहीत.
रास्तेसे चलते हुए मुझे एक आदमी मिला, वह पूरी तरह से जन्जिरोसे जकड़ा हुआ था। वह रस्तेका हर एक पत्थर उठता था और जन्जिरोको लगता था। मैंने उसे पूछा की तुम यह क्या कर रहे हो? वह बोला मैं परिस ढूंढ़ रहा हु। जिस दिन मुझे परिस मिलेगा, मैं इतनी सारी जन्जिरोंका सोना करके पूरी जिंदगी आरामसे रहूँगा । इतनी बात करके वह फिरसे परिस खोजते हुए आगे निकल पड़ा। कई दिनों बाद वही आदमी मुझे फिरसे मिला, इसबार उसके सभी जन्जिरोंका सोना हुवा था और उसके हाथ में एक लोहे का टुकड़ा था । मैंने उसे पुछा की अब तो सभी जन्जिरोंका सोना हुवा है अभी क्या ढूंढ़ रहे हो? वह रोता हुए बोला की उसे परिस तो मिला था पर पत्थर जंजीर को लगाकर फेकने की आदत इतनी हो गयी थी की उसने वह परिस भी कही फेक दिया था। अभी वही परिस फिरसे ढूंढ़ रहा हु। कुछ इसी तरह मनुष्य की जिंदगी गुजर रही है।
आज  अनेक  बुवा बाबा आपली शिष्य मंडळी जमा करून  व्यवस्थित  पैसे कमावत  आहेत . त्यांच्या शिष्यागणात  हुशार लोक  आपली पोळी भाजून  घेतात. कोणी आपला व्यवसाय  वाढविण्यासाठी कोणत्या तरी मार्गात  जातो . तर कोणी आपल्याला मान  मिळावा म्हणून  ह्या मार्गात आलेले दिसतात. बाबा सुद्धा अशा खुश्कामास्कार्याना आपल्या जवळ  सांभाळताना दिसतात. हे खुश्कामास्कारे हेच त्या बाबाचे बलस्थान असते. हे लोक  गरीब  भोळ्या भक्तांना बाबाची महती सांगून  त्यांना त्या जाळ्यात  ओढतात  आणि बाबासोबत  आपला व्यवसाय  वृद्धिंगत  करतात. काही बाबा तर कर्मकांडाची शिदोरी घेऊनच  अवतार घेतात. आणि शुद्धीवर येवू पाहणाऱ्या समाजाला...
खूप  कमावून  ठेवेले तर पुढची पिढी आळशी निघते, आणि बापजाद्यांच्या कमाईवर ऐश  करते. लायक  मुलगा  वडिलांच्या कामायीमध्ये आपल्या कर्तुत्वाने आणखी वृद्धी करतो. तर नालायक  मुले वडिलांची कमाई केवळ खर्च  करतात.
प्रत्येक गोष्टीची शास्त्रीय मीमांसा करून मगच ती गोष्ट करावी. सध्या मात्र सगळीकडे अंधानुकरण करण्याकडे माणसाचा कल आहे असे दिसून येते. यासंदर्भात एक गोष्ट आहे. एकदा एका आश्रमात एक महाराज होते. त्यांचे अनेक शिष्य तेथे विद्यार्जन करण्यासाठी तेथे राहत असत. महाराजांनि एक मांजर पाळलेली होती. ती मांजर आरती चालू असताना खूपच त्रास देत असे. म्हणून एकदा महाराजांनी एका शिष्याला आरतीच्या आधी ती मांजर बांधून ठेवायला सांगितली. महाराजांच्या आज्ञेवरून शिष्याने ती मांजर बांधून ठेवली आणि आरती झाल्यावर तिला सोडून दिले. झाले, तेंव्हापासून आरती करण्याआधी मांजर बांधायची प्रथा चालू झाली . कालांतराने महाराजांचे निधन झाले पण आरती पूर्वी...
नवीन व्याख्या - आपली गाडी थांबवून दुसर्याला पुढे जावू देणे याला म्हणतात संस्कृती . दुसर्यांबरोबर आपली गाडी पुढे नेणे म्हणजे प्रकृती. पण दुसर्याचा विचार न करता आपली गाडी पुढे नेणे म्हणजे विकृती.
जीवन जेव्हा हळू होते तेव्हा माणूस माणसाला ओळखत होता , परंतु आता जीवन खूपच व्यस्त झाले आहे, माणूस माणसाला ओळखत नाही, तो आता फक्त पैश्याला ओळखतो, आणि पैश्याच्या जोरावर माणसे विकत घेतो . परंतु तो हे विसरतो कि, पैसा हा कधीही तुमच्या कामाला येऊ शकत नाही, जितका माणूस कामाला येतो. आपला शब्द झेलणारे माणसे हि  पैश्याच्या जोरावर विकत घेतलेल्या गुंडा पुंडा पेक्षा केव्हाही जास्त मोलाची असतात.
नितीमत्ता अनीतीने हजारो रुपये कमावणाऱ्या पेक्षा नीतीने अर्धपोटी राहणारा जास्त सुखी असतो, परंतु आपल्या समाजात कोणी किती पैसा कमावला याला जास्त महत्व आहे. नीतिवान मनुष्य केवळ स्वताचे पोट भरतो परंतु अनितीवान मनुष्य आपल्या सात पिढ्यांचे पैसे कमावतो आणि तेही इतरांचे वाईट करून. तेंव्हा विचार करा कि आपण दुसर्यांचे जेवण ओरबाडून तर खात नाही ना ! आज प्रत्येक जन आपल्या तटावर तूप वाढून घ्यायला बघत आहे, परंतु दुसर्याच्या ताटात शिळी भाकरी आहे कि नाही याचे कोणालाही भान नाही. 
माणूस कशासाठी जगतो तेच विसरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काय लागते? परंतु माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा त्याला जन्मभर स्वताचा नोकर करून ठेवते. पैसा आणि सत्ता मिळविण्यासाठी तो आयुष्यभर गुलामीत दिवस काढतो, आणि मरताना त्याला प्रचंड वेदना होतात. आपण कमावलेले सर्व काही इथेच सोडून जाताना त्याला आपल्या कर्माचे अत्यंत वाईट वाटते. कष्ट करणारा माणूस मंदिरात फार तर डोके टेकवून दर्शन घेतो, ५/१० रुपये पेटीत दान करतो, परंतु तो किलोचे किंवा मनाचे सिंहासन देवू शकत नाही, मात्र भल्या बुर्या मार्गाने कमावलेला पैसा पाचवा यासाठी अनेक लोक देवाला आपल्या दुष्टकार्मात सहभागी होण्यासाठी असे दान करतात,  
प्रत्येक प्राणीमात्र आपल्या कोशामध्ये आनंदी असतो. आपले वागणे हे प्रत्येकाला चांगले आहे असे वाटते, परंतु जेव्हा इतर लोक तुम्हाला चांगले म्हणतील तेव्हाच आपण चांगले आहोत असे समजावे. मेल्यानंतर माणूस स्वर्गात गेला कि नरकात हे कसे ओळखावे? जर मेल्यानंतर लोक तुमच्याबद्दल चांगले बोलले तर तुम्ही स्वर्गात गेलात असे समजावे, आणि लोकांनी निंदा केली तर तुम्ही नरकात गेलात असे समजावे.
मूर्ख लोक लुबाडणाऱ्या भोंदू साधूवर विश्वास ठेवतात, परंतु सत्य बोलणाऱ्या सामान्य माणसाचे मात्र हसू होते. कष्टाने कमावणारा माणूस काही मनाचे सोन्या चांदीचे सिंहासन देवाला अर्पण करू शकत नाही, नितीमत्ता बाजूला ठेऊन गरिबांना लुबाडून देवाला संपत्ती अर्पण करणारा कलियुगात महा दानी ठरविला जातो....
the management ethics>>>>>>>
A man in a hot air balloon realized he was lost. He reduced altitude and spotted a woman below. He descended a bit more and shouted, "Excuse me, can you help me? I promised a friend I would meet him an hour ago, but I don't know where I am." The woman below replied, "You're in a hot air balloon hovering approximately 30 feet above the ground. You're between 40 and 41 degrees north latitude and between 59 and 60 degrees west longitude." "You must be an engineer," said the balloonist. "I am," replied the woman, "How did you know?" "Well," answered the balloonist, "everything you told me is, technically correct, but I've no idea what to make of your information, and the fact is I'm still lost. Frankly, you've not been much help at all. ...
करोडो रुपये स्विस बँकेत जमा करणारे नेते जनतेवर अतिरिक्त tax लावताना लाजत का नाहीत? जनतेच्या tax  च्या रुपात जमा झालेल्या पैश्यावर गब्बर झालेल्या डोमकावाल्याना आपण परत परत निवडून देणार का? जनतेचे भले करणारे आणि त्यांची सेवा करणारे नेते आता फक्त पुस्तकात पाहायचे का? काहीही कर्तुत्व नसताना केवळ बापजाद्यांच्या पुण्याईवर नेते बनलेल्या बिनडोक आणि खाबू गिधाडांना आपण का मते देतो? झोपड पट्टी मध्ये पैसे वाटून कोणीही निवडून येतो, मात्र त्याने वाटलेले पैसे मात्र आपण कररूपाने सरकार जमा करतो, परंतु ते सर्व पुढील निवडणुकीसाठी स्विस बँकेत जमा होतात. विचार करा, जर असेच चालू राहिले तर हे धनदांडगे सर्व सत्ता नी शासन आपल्या कब्जात घेऊन आपले जीवन जगणे मुश्कील करून टाकतील. उठा , जागा , आणि बदल करा. आपले मत केवळ लायक उमेदवारालाच द्या.    
स्वत उपाशी राहून दुसऱ्याला खाऊ घालणे म्हणजे संस्कृती, स्वताचे जेवण दुसऱ्याबरोबर वाटून खाणे म्हणजे प्रकृती, परंतु दुसऱ्याचे जेवण ओरबाडून खाणे म्हणजे विकृती !!!!!!!
माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. ह्या ब्लॉग वर व्यक्त करण्यात आलेले विचार किंवा मते हि माझी वैयक्तिक आहेत, त्यामध्ये कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आपण माझ्या मतांशी सहमत असाल तर कृपया आपले मत नोंदवा. धन्यवाद!!!!